बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, नितीन गडकरींची ऑफर

 

रायगड माझा वृत्त

नवी दिल्ली : माझ्याकडे गुंतवणूक केली तर बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ, असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या बॉण्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला बँकांपेक्षा जास्त व्याज मिळेल, असं गडकरी म्हणाले. आमचं टोल कलेक्शन चांगलं आहे. तसंच आमची रेटिंग ट्रिपल ए आहे. भारतात सध्या गुंतवणूकदारांना बँकेकडून जेवढं व्याज मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही. मी आठ टक्के व्याज दिलं आहे आणि यापेक्षाही थोडं जास्त व्याज द्यायची माझी तयारी आहे, असं गडकरी म्हणाले.

शिपिंगमध्येही गुंतवणुकीची संधी

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या २५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. आम्ही तुमच्या पैशांनी रस्ते बनवू आणि त्यानंतर त्याचा परतावा देऊ. रस्त्यांबरोबरच शिपिंगमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण आमची पोर्टही फायद्यामध्ये आहेत, असा सल्ला गडकरींनी दिला.

एनएचएआयला बॉण्डच्या माध्यमातून ६३ हजार कोटी रुपये जमा करायचे आहेत. मागच्या वर्षी एनएचएआयनं ५२ हजार कोटी रुपये जमा केले होते. सरकारच्या बजेटपेक्षा आमचं काम नागरिकांच्या पैशांमधून होतं. आम्ही लोकांच्या पैशांचा वापर करू आणि त्यांना प्रत्येक महिन्याला परतावा देऊ, असा दावा गडकरींनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत