बँक ऑफ महाराष्ट्रचे MD मराठेंना जमीन मंजूर

पुणे : रायगड माझा 

पुणे न्यायालयाने आज बँक ऑफ महाराष्ट्रचे एम. डी. रविंद्र मराठे यांना जमीन मंजूर केला. त्यांना बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियम बाह्य कर्ज दिल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती.

महाराष्ट्रातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियम बाह्य कर्ज दिल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक मराठे  यांना अटक केली होती. त्यांची आज न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे.

मराठेंच्या अटकेला बँक कर्मचारी असोसिएशनने विरोध केला होता. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अटक प्रकरणी पुणे पोलिसांवर उपरोधीक टोला मारत पुणेचे पोलिस अतिकृतीशील झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या मते बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आरबीआयला असतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत