बंगळुरूच्या एअर शोमध्ये भीषण आग, 300 गाड्यांचा कोळसा

बंगरुळू : रायगड माझा ऑनलाईन 

बंगळुरूमध्ये येलेहंका येथे सुरू असलेल्या हवाई दलाच्या एअर शो कार्यक्रमात भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 300 गाड्या जळून खाक झाल्या असून सिगारेटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अग्निशमन दल व हवाई दलाच्या विमानांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे.

येलेहंका हवाई तळावर हवाई दलाचा पाच दिवसांचा एअर शो सुरू आहे. या कार्यक्रमासाठी हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आले होते व त्यांच्या गाड्या या पार्किंगमध्ये होत्या. शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही आग लागली होती. पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात सुक्या गवताच्या पेंढ्या होत्या. कुणीतरी पेटती सिगारेट याठिकाणी फेटकल्याने या गवताच्या पेंढ्यानी पेट घेतला. तसेच घटनास्थळी सोसाट्याचा वार असल्याने आग काही मिनिटातचं पसरत गेली व आगीने भीषण रूप घेतेले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत