बंगालच्या उपसागरात कंटेनर जहाजाला आग, कर्मचारी सुखरूप!

मुंबई : रायगड माझा वृत्त 

बंगालच्या उपसागरात एका खासगी कंटेनर जहाजाला आग लागली. नौदल आणि कोस्ट गार्डनं तातडीनं आपली मोठी जहाजं या जहाजाच्या दिशेनं रवाना केली. जहाजावरचे सर्व 22 जण सुखरूप आहेत. एम.व्ही. एसएसएस कोलकाता असं या जहाजाचं नाव आहे.

या जहाजावर 464 कंटेनर आहेत. त्यापैकी एकामध्ये आज सकाळी स्फोट झाला, आणि आग लागली. बघता बघता ही आग आणखी 60 कंटेनरमध्ये पसरली. काही केल्या आग आटोक्यात येईना. शेवटी कॅप्टननं उथळ पाण्याकडे जहाज वळवलं. सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेलगळतीची शक्यताही नाकारता येत नाहीये.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत