बंटी कुकडे यांचा तडकाफडकी राजीनामा?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Image result for सभापती बंटी कुकडे"

नागपूर : महाराष्ट्र News 24 वृत्त

महापालिका परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी सभापतिपदाचा तडकाफडकी राजीनामा महापौर संदीप जोशी यांच्याकडे सादर केला आहे. राजीनामा देण्याचे कारण समजले नसून, भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना हा निर्णय घेण्याची वेळ आली अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी बंटी कुकडे यांच्या कामांची अनेकदा प्रशंसा केली आहे. शहर बस सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोमवारी महापौर संदीप जोशी व परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी “आपली बस’च्या प्रवाशांसोबत संवाद साधला होता. सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर महापौरांनी तातडीने याबाबत प्रस्ताव तयार करून त्या सोडविण्याचे निर्देश दिले.

बंटी कुकडे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदासाठी शहरातील अनेक नगरसेवक इच्छुक होते. त्यात प्रामुख्याने नगरसेवक बाल्या बोरकर यांचा समावेश होता. इतकेच नव्हे तर तत्कालीन शहराध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी कुकडेंना राजीनामादेखील मागितला होता. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंटी कुकडे यांना कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रत्येकाचाच नाइलाज झाला. मात्र, गडकरींच्या निर्णयानंतर कुकडेंना मिळालेली मुदतवाढ अनेकांच्या पचनी पडली नसल्याचे चिन्ह आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत