बंदला राज्यभर प्रतिसाद, अनेक ठिकाणी रास्‍तारोको

महाराष्‍ट्र बंद Live अपडेट

 

रायगड माझा वृत्त 

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज (९ ऑगस्‍ट) रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी बंदला सकाळपासूनच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आहे. राज्यभरात बहुतेक ठिकाणी बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी देण्यात आली आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्‍था कडक केली आहे.

गावपातळीपासून हा बंद पुकारण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्‍त्यावर उतरला आहे. गावापासून ते जिल्‍ह्यापर्यंत सर्व रस्‍ते अडविण्यात येणार आहेत. यादरम्यान, रुग्‍णवाहिका, स्‍कूल बस, धार्मिक यात्रेकडे जाणारी वाहने आदींना वगळण्यात आले आहे.

संबंधित :

राज्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद 

नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप

 मुंबईसह आज महाराष्ट्र बंद

आंदोलनावर ड्रोनची नजर!

पोलिसांना ‘गनिमी कावा’ची भीती

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या औरंगाबाद येथील बैठकीत महाराष्‍ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला ३२ जिल्ह्यांमधून समन्वयक उपस्थित होते. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, बंदमध्ये कोणतीही हिंसा करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अपडेट : 

नाशिक : चांदवडला अनोखा रिंगण सोहळा करीत सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गवर आंदोलन

सांगली : विटा शहरातून दुचाकी रॅली, दुकाने बंद, आंदोलनाला मोठा प्रतिसाद

नगर : जामखेड शहरातील खर्डा चौकात बैलगाड्यांसह आंदोलनाला सुरवात, खर्डा, जवळा, अरणगाव व जामखेड शहरात सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत चक्काजाम

औरंगाबाद : हासुल सांगवी बायपासवर टायर जाळले, आंदोलन सुरू

रायगड : महाड बसस्थानकासमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाजाच्या संयोजकांकडून रास्ता रोकोस प्रारंभ

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरील सर्व दुकाने बंद

सोलापूर : बोंडलेत पुणे-पंढरपूर राष्‍ट्रीय महामार्ग क्र. ९६५ वर चक्‍काजाम

रायगड : महाड शहरातील मुख्य बाजारपेठेसह महाड बसस्थानक तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शंभर टक्के बंद.

नाशिक : कळवणमध्ये बस सेवा बंद, ठिय्‍या आंदोलन सुरू

उस्‍मानाबाद : परंडा, येरमाळामध्ये सकाळपासून शांततेत बंद

महाराष्‍ट्र बंदमुळे ठाण्यात कडकडीत पोलिस बंदोबस्त; शाळा, कॉलेज देखील बंद

औरंगाबाद : सिडको चौकात रास्‍तारोको, ठिय्‍या आंदोलन

पालघर : नालासोपार्‍यात बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद,  पेट्रोल पंप, दुकाने बंद, रिक्षा परिवहन सेवा सुरू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील सर्वच गावांत आंदोलक रस्‍त्यावर, रास्‍ता रोको करून आंदोलन सुरु

रायगड : पोलादपूरमध्ये कडकडीत बंद; दुकाने, हॉटेल व्याससायिक बंदमध्ये सहभागी, पोलिस प्रशासन सज्‍ज

औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या जाधववाडी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत कडकडीत बंद

सोलापूर : माळशिरसमधील पिलीव येथे बंद नाही. शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर.

औरंगाबाद : औरंगाबाद-जळगाव रस्‍त्यावर जाधववाडी मार्केटजवळ उभी असणारी खासगी बस पेटविली, रस्‍त्यावर अज्ञातांनी टायर जाळले.

औरंगाबाद – नगर महामार्गावर बजाज गेट येथे रास्‍ता रोको

सोलापुरात पहाटेपासून आंदोलनास सुरुवात; माळशिरस तालुका बंद

अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळले 

नागपूर : मराठा क्रांती मोर्चा बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी शाळांना सुट्टी जाहीर

हिंगोली : शाळा, महाविद्यालये बंद राहणार

ठाणे, पुणे व औरंगाबादमध्ये शाळा बंद राहणार

लातूरमध्ये मराठा आंदोलकांकडून मध्यरात्रीपासूनच रास्तारोको

नांदेड, जालना, परभणी, अकोलामध्ये बंद

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत