बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना चिक्की वाटप

समाधान दिसले | खोपोली 

गणेशोत्सव सर्वत्र ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात हा सण आनंदाने आणि कायदा सुव्यवस्था अबादीत ठेवून जनतेला आनंदाने सण साजरा करता यावा यासाठी सर्वात मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावरा असते. पोलीस घरदार सोडून ड्युटी बजावत असल्याने त्याच्या कुटुंबाला ही वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे २४ तास डयुटी बजावणाऱ्या पोलिसांना या काळात सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या वणवतीने चक्की वाटप करण्यात आली.

यावेळी रायगड डीआयजी श्रीमती बाविस्कर, खोपोली पोलिस निरिक्षक के.एस.हेगाजे, सहाय्यक पोलिस निरिक्षक आर.पवार, उप निरिक्षक श्रीरंग किसवे यांच्यासह पोलीस कर्मचारी सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा उषाताई मुंढे, रायगड जिल्हाध्यक्ष गोपिनाथ सोनावणे, जेष्ठ सामाजिक नेते भाई ओव्हाळ उपस्थित होते.

खोपोली शहरात दोन लाखाहून अधिक नागरिक वास्तव्य करीत असल्याने या शहरात मोठ्या आनंदाने साजरा व्हावा यासाठी खोपोली पोलीस निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी व कर्मचारी होमगार्ड प्रत्येक ठिकाणी २४ तास बंदोबस्तासाठी पहारा देत होते, पोलिसांना जनतेची सेवा करण्यातच सण साजरा करीत असतात. त्यामुळे खोपोली पोलिस वर्गाला वेगळा विरंगुळा व अधिक बळ मिळावे यासाठी खोपोलीत सामाजिक काम करणारी सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या वतीने चिक्की वाटप करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत