बंद घर फोडून 5 लाखांचा ऐवज लंपास  कर्जत शहरातील घटना : पोलीस ठाण्यात गुन्हा

कर्जत- भूषण प्रधान

कर्जत शहरात वर्षभरापासून घरफोड्यांचे सत्र सुरु असून पोलिसांना चोर्या, घरफोड्या रोखण्यात फारसे यश येत नसल्याने कर्जत शहरात चोर्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरु आहे, 22 फेब्रुवारी रोजी विठ्ठल नगर कर्जत येथील एका घराचे कुलूप तोडून, त्यावाटे घरात प्रवेश करून, लोखंडी कपाटातील ५ लाख किमतीचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी चोरून नेले. तसेच 4 साक्षीदार रा. विठ्ठल नगर कर्जत यांचे घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्जत विठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या हरी पुरुषोत्तम मराठे यांच्या घरी गुरुवारी चोरी झाली असून तब्बल 5 लाख 4 हजार 450 रुपयांचा किमतीचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने आणि 1लाख 40 हजार रोख रक्कम आणि चांदीचे भांडे असा समावेश आह . या बाबत कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .
पुरुषोत्तम मराठे हे काही कामानिमीत्त 19 ते 22 तारखेपर्यंत बाहेरगावी गेले होते . बंद घर पाहून चोरटयांनी याच चार दिवसात कधीतरी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातील 5 लाख 4 हजार 450 रुपयांचा किमतीचा ऐवज चोरून नेला . यामध्ये काही सोन्याचे दागिने तर रोख रक्कम होती . मराठे बाहेरगावावरून घरी परतल्यावर हि बाब त्यांच्या लक्षात आली.
यासंदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 380,454,457,511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असूनकर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लोखंडे अधिक तपास करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत