बंद सम्राटाचे निधन

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज  सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामगार नेते, मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.

Image result for जॉर्ज फर्नांडिस

गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी मंगळुरु येथे झाला. सहा भावांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले.

स्वातंत्र्यानंतर तीन वेतन आयोग आले होते. पण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात अपेक्षित वाढ झाली नव्हती. जॉर्ज फर्नाडिस १९७३ मध्ये ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप झाला. या आंदोलनामुळे जॉर्ज फर्नांडिस यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळवून दिली. त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई. रेल्वे कामगारांवर त्यांची मजबूत पकड होती.

भारताच्या राजकारणात फर्नांडिस प्रसिद्ध झाले ते आणीबाणीच्या काळात. फर्नांडिस यांचा जन्म मंगळुरु येथे झाला, कार्यक्षेत्र मुंबई पण निवडणूक लढवली तिहार तुरुंगातून. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते.आचार्य अत्रे , कॉम्रेड डांगे  यांच्या साथीने जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईत अनेक लढे  लढले.

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत