बजरंग पुनियाची सुवर्णपदकाला गवसणी

जकार्ता : भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.

बजरंगने 65 किलो वजनीगटामध्ये जपानच्या मल्लाचा 10-8 असा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. हा सामना नेमका कोण जिंकेल, हे सहजासहजी सांगता येत नव्हते. पण बजरंगने तांत्रिक गोष्टींवर जास्त भर दिला. त्याचबरोबर अनुभवही त्याने पणाला लावला होता. अखेरच्या काही क्षणांमध्ये बजरंगने सरस खेळ केला. त्यामुळेच त्याला हे सुवर्णपदक पटकावता आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत