‘बजाज’ची इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच

नवी दिल्ली : महाराष्ट्र News 24 वृत्त

वाहन निर्माता कंपनी बजाज कडून  पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (E-Scooter) १६ ऑक्टोबर रोजी लॉन्च करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनीकडून या नव्या  स्कूटरचं नाव ‘ई-चेतक’ ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. ही नवीन स्कूटर बजाजच्या नव्या सब ब्रँड अर्बेनाइटचा भाग आहे.

नव्याने लॉन्च करण्यात येणाऱ्या या स्कूटरचा सेल नवीन वर्षाच्या सुरुवातील म्हणजेच २०२०मध्ये सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यातील रस्त्यांवर चाचणीदरम्यान या स्कूटरला गुप्त कॅमेराद्वारे कैद करण्यात आले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलइडी लाइट, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फिचर्स असण्याची शक्यता आहे. एका ऑटो वेबसाइटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरची किंमत जवळपास एक लाख रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र बजाजकडून ही स्कूटर कमीत कमी किंमतीत लॉन्च करण्याचा प्रयत्न आहे. बजाजकडून स्कूटरचा अधिकृत फोटो अजून जाहीर करण्यात आलेला  नाही.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत