बदलापूर एमआयडीसीत भीषण आग

बदलापूर : रायगड माझा वृत्त 

बदलापूर एमआयडीसीत भीषण आग लागली आहे. प्लॅटिनम पॉलिमर कंपनीला ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी उपस्थित असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आगीमुळे कंपनीतील केमिकल ड्रम्सचा स्फोट होत असून आवाजाने परिसर हादरला आहे.

सुदैवाने शुक्रवार असल्याने कंपनीतील काम बंद होते. यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र आग वाढत असून ती लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आग विझवण्यासाठी बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत