बदलापूर मध्ये रंगणार आगरी महोत्सव 

बदलापूर : अजय गायकवाड 

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या आगरी समाजाची लोकसंस्कृती, रूढी आणि  परंपरा यांना उजाळा  देणाऱ्या  आगरी महोत्सवाचे आगरी समाज उन्नती मंडळ आणि आगरी युवक संघटना, अंबरनाथ तालुका  यांच्या वतीने १८ मे ते 20 मे या कालावधीत बदलापूरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. आगरी समाजाला संघटित करून आगरी  परंपरा  नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न या महोत्सवातून होणार आहे.  

आगरी भाषा आणि आगरी परंपरा याचे जतन करण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात येणार आहे. रूढी आणि परंपरा याचे जतन करताना आगरी युवकांनी नव्या युगाचा मंत्र घेऊन शिक्षण आणि उद्योगात आपला  नावलौकिक वाढवावा तसेच विविध करिअर विषयी आगरी  युवकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

एकूणच आगरी परंपरेला उजाळा देणाऱ्या या महोत्सवा निमित्त बाईक रॅली  येणार आहे. याशिवाय सैराट फेम रिंकू राजगुरू या  महोत्सवाचे मुख्य  आकर्षण असणार आहे. चला हवा येऊ द्या हा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. आगरी विरासत या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   अंबरनाथ तालुका  क्रीडा संकुलात आयोजन करण्यात येणाऱ्या  या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आगरी समाजउन्नती मंडळाचेचे अध्यक्ष दीपक म्हात्रे आणि आगरी युवक  संघटनेचे अध्यक्ष मयूर पिसेकर यांच्यसह अनेक नेते कार्यकर्ते या महोत्सवाच्या आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत