बनावट कोरोना अहवाल देणारी दुकली जेरबंद

नवी मुंबई : साईनाथ भोईर 

नवी मुंबईतील एका खाजगी कंपनीतील १३३ कामगारांचे बनावट कोरोना अहवाल बनविणाऱ्या दुकलीला रबाळे एमयआयडीसीई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देवीदास घुले महमंद वसीम असलम शेख अशी अटक केलेल्या आरोपिंची नावे आहेत.

वाढत्या कोरोना संक्रमणामुळे शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्याप्रमाणे रबाळे एमआयडीसिमधील प्रवीण इंडस्ट्रीज या कंपनीतील १३३ कामगारांची ८ एप्रिल रोजी कंपनीतच शिबिर भरवून कोविड चाचणी घेण्यात आली होती. यासाठी कंपनीने ठाण्यातील मिडटाऊन डायग्नोस्टिक लॅबचा मालक देविदास घुले याला कळविले होते. कल्याण येथील परफेक्ट हेल्थ केअरचा मालक महमद वसीम अस्लम शेख याच्या मदतीने हा कॅम्प घेतला होता. शेख याला थायरोकेअर लॅबने कोरोना चाचणीचे नमुने जमा करण्यासाठी नेमलेले आहे. त्यानुसार १३३ कामगारांचे नमुने थायरोकेअर लॅब मध्ये चाचणीला पाठवणार असल्याचे त्याने सांगितले होते. काही दिवसांनी त्याने सर्व कामगारांचे रिपोर्ट कंपनीकडे सोपवले होते. मात्र मिळालेले सर्व रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने व सर्व अहवालावर एकच क्यू आर कोड असल्याने या अहवालांवर कंपनीला संशय आला आणि त्यांनी थायरोकेअर लॅबमध्ये चौकशी केली.

यावेळी सर्वच रिपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे थायरो केअर लॅबच्या वतीने रबाळे एमआयडीसी पोलीसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी तपासाठी एक पथक नेमले आणि त्यांनी गुरुवारी दुपारी ठाणे व कल्याण येथून देविदास घुले व महमद शेख याला अटक केली आहे. या जोडीने बनावट कोरोना रिपोर्ट देऊन कंपनीची, थायरो केअरची तसेच कोविड १९ च्या संबंधित निष्काळजीपणा केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे कामगारांच्या आरोग्याशी देखील धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाने या दोघांना १९ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. असून या दोघांनी अजून किती जणांना असे अहवाल दिले आहेत याचा तपास रबाले एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत