बलात्काराच्या आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या!

पुणे : रायगड माझा वृत्त 

पुण्याच्या घोडेगाव पोलीस ठाण्याच्या तुरुंगात एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घटना उघडकीस आली. गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आरोपीने गेल्या वर्षी लांडेवाडी येथे दरोडा टाकून एका महिलेवर बलात्कार केला होता.

सुलदास उर्फ कुक्या काळे (२५) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु ज्या वेळी आरोपी सुलदास उर्फ कुक्या काळे याने तुरुंगात आत्महत्या केली त्यावेळी तेथील पोलीस कर्मचारी काय करत होते असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का? याप्रकरणी घोडेगाव पोलीस उपनिरीक्षक भालेकर यांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला. तसेच डी.वाय.एस.पी राम पठारे यांनी देखील बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

कुक्याला मंचर पोलिसांनी अहमदनगर पोलिसांकडून ताब्यात घेतलं होत. न्यायालयीन कोठडी घेतली होती. त्यानुसार त्याला घोडेगाव येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. परंतु गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुक्याने ब्लँकेटने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुलदासने गेल्या वर्षी लांडेवाडी येथील घरात दरोडा टाकून ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. त्याला एका गुन्ह्यात अहमदनगर पोलिसांनी अटक केली होती.तो मूळचा श्रीगोंदा येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. अधिक तपास घोडेगाव पोलीस करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत