बलात्कारानंतर गळा चिरून आदिवासी महिलेची हत्या, उरणमधील खळबळजनक घटना

 उरण – विरेश मोडखरकर

उरणमधील दिघोडे गावातील समुद्र किनारी भागात अवघ्या 25 वर्षे वयाच्या आदिवासी महिलेवर अज्ञात इसमाने पाशवी बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे येथील परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून, पोलीस खुन्याचा शोध घेत आहेत.

दिघोडे, कंठवली कातकरी वाडीत आपल्या पती आणि सासूसोबत राहणारी अनुसया प्रल्हाद वाघमारे हीची अज्ञाताने बलात्कार करून हत्या केली असून रविवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली आहे. मात्र हे निर्घृण कृत्य करणारा कोण असू शकतो याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या अज्ञात इसमाविरोधात भा.द.वि 376,302 कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी करत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अनुसया वाघमारे ही तिचे पती आणि सासू यांच्या सोबत रहात होती. तिची सासू आणि पती हे वितभट्टीवर काम करत असून, ही महिला दोन दिवसांपासून घरी आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या महिलेचा मृतदेह पडीक कार्यालयाच्या वास्तूमध्ये आढळून आल्याने सादर प्रकार उघड झाला आहे.पोलोसांकडून महिलेची ओळख पाठवण्यात आले असून, या घटनेतील अज्ञात आरोपी कोण ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत