बलात्कार पीडितेला हाकललं, केसरकरांविरोधात तक्रार दाखल

मुंबई : रायगड माझा वृत्त

बलात्कारपीडित मायलेकी आपले गाऱ्हाणे घेऊन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेल्या असता केसरकर यांनी हाकलून दिल्याचा आरोप या पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणी केसरकर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.केसरकर यांनी, ‘तुमची लायकी काय आहे, जास्त बोलायचे नाही’, असे म्हणत दालनातून हाकलून दिल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. या मायलेकींवर मे २०१७मध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दीड महिन्यानंतर तक्रार नोंदवली. पण स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे सात आरोपींपैकी एकावरच गुन्हा दाखल केला होता. आता आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले जात असून, न्याय मिळण्यासाठी पुन्हा केसरकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हाकलून दिल्याचे पीडितांचे म्हणणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत