बलात्कार प्रकरणी २ अल्पवयीन अटकेत

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

एका ९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना अटक करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक १० वर्षांचा, तर दुसरा ११ वर्षांचा आहे. ही घटना अंधेरी पश्चिम येथे ३० जानेवारी रोजी घडली. दोघांना १ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले.
पीडित मुलगी आणि दोघे अल्पवयीन मुले अंधेरीतील एका टोलेजंग इमारतीत राहतात. मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर अंबोली पालिसांनी या दोन शाळकरी मुलांना अटक केली. मुलीबरोबर खेळत असताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या दोन मुलांनी पीडित मुलीला इमारतीच्या १२ आणि १३व्या मजल्याच्या जिन्याकडील मधल्या कॉरिडोरमध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला घरी जाऊ दिले. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुलीला मूत्र विसर्जन करताना त्रास जाणवू लागला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध पोक्सो आणि बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत