बसमध्ये चढताना चोरानी केला महिलेचा मंगळसूत्र लंपास; म्हसळा शहरातील घटना

म्हसळा : निकेश कोकचा

म्हसळा येथील बस स्थानकावर बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एका महिलेचा काही अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना बुधवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.यामुळे शहरातील सुरक्षेबाबत महिलावर्गाकडून प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत सविस्तरपणे वृत्त असे की,म्हसळा तालुक्यातील गणेश नगर,बनोटी येथे राहणारी भारती गोविंद म्हात्रे वय ४८ वर्षे आपल्या आजारी नातवाला माणगाव येथे रुग्णालयात नेह्ण्यासाठी निघाली.भारती म्हात्रे म्हसळा स्थानकावर आल्यानंतर तेथून सकाळी १०:३० वाजता माणगावला जाणारी श्रीवर्धन-म्हसळा-माणगाव बसमध्ये चढताना मागून अज्ञात चोरट्यांनी हळूच त्यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचा मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली.याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसळा पोलिसांचा सुस्त कारभारामुळे चोरी….

लग्नसराई मुळे बाजारपेठेत रहदारीचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.यामुळे म्हसळा शहरातील रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते मात्र ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी म्हसळा पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी रस्त्यावर दिसत नाही.पोलिसांच्या या गोष्टीचाच फायदा ह्या चोरांनी घेतला असून महिलेचा मंगळसूत्र लंपास केला अशी चर्चा सध्या शहरामध्ये सुरु आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत