बहिणीने रिमोट दिला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलीने लावला गळफास

रायगड माझा वृत्त | मुंबई 

Image result for tv remote in child handवाद कधी कोणत्या टोकाला पोहचेल हे काही सांगता येणार नाही. सेक्टर 12 मध्ये हैराण करणारी ही घटना आहे. खेळत असताना 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10वर्षाची मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडून रिमोट मागत होती. बहिणीने रिमोट न दिल्यामुळे ती उठून दुसऱ्या खोलीत खेळायला गेली. मात्र खेळत असताना ओढणी गळ्याला बांधली आणि तिला फास लागला. ही घटना कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने मुलीला मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारा दरम्यान डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या 10 वर्षाच्या मुलीने मानुषी रावतने आपल्या मोठ्या बहिणीकडे रिमोट मागितला होता. मात्र मोठ्या बहिणीने विरोध केल्यामुळे दुसऱ्या खोलीत खेळायला गेली आणि हा प्रकार घडला.  मानुषी आपल्या मोठ्या बहिणीसोबत घरी खेळत होती. या दोन्ही मुलींना आई वडिल एकटेच ठेवून कामाला निघून गेले होते. वादळ आल्यामुळे या दोन्ही मुलींच्या शाळा बंद होत्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत