बांग्लादेशी परत जात नसतील तर त्यांना गोळ्या घाला, असं भाजपाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

गुवाहाटी: रायगड माझा वृत्त 

आसाममध्ये एनआरसी (राष्ट्रीय नागरिक रजिस्टर)ची दुसरी यादी जाहीर केल्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही एनआरसी लागू करण्याची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावरून राजकीय हालचाली होत असताना हैदराबाद येथील भाजप आमदाराने अवैधरित्या घुसखोरी करणारे बांग्लादेशी परत जात नसतील तर त्यांना गोळ्या घाला, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राजा सिंह असं या भाजप आमदाराचं नाव असून ते हैदराबाद येथील गोशमहल विधानसभेचे आमदार आहेत.

राजा सिंह यांच्या आधी पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी त्यांचं सरकार आलं तर आसामप्रमाणेच पश्चिम बंगालमध्येही एनआरसी लागू होईल. बंगालमध्ये तब्बल १ कोटीहून अधिक बांग्लादेशी अवैधरित्या राहतात. पण, आम्ही एकालाही सोडणार नाही. आता त्यांच्या वाईट काळ सुरू झाला आहे. जे त्यांना समर्थन देतील त्यांनीही आपलं सामान गुंडाळावं, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत