बाथरुममधून उडी मारुन शिक्षकाची आत्महत्या!

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

उपमुख्याध्यापकाने शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाथरुममधून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. अंधेरी पश्चिममधील कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी या शाळेत ही धक्कादायक घटना घडली.

राम कांबळे (वय ४८ वर्ष) असे या शिक्षकाचं नाव असून त्यांच्याकडे सुसाईड नोटही सापडली आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. या प्रकरणी डीएन नगर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राम कांबळे यांनी आत्महत्या केली, तेव्हा शाळेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होती.

राम कांबळे शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत पोहोचले. सकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावली. त्यानंतर ते परीक्षा हॉलमध्ये गेले आणि तिथे काही वेळ थांबले. यानंतर थोड्याच वेळात ते शाळेच्या खाली पडलेले आढळले. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. पण त्यांचा आधीच मृत्यू झाला होता, असे शाळेच्या अधिकाºयांनी सांगितले.राम कांबळे हे आमच्या शाळेत उत्कृष्ट शिक्षकांपैकी एक होते. ते गणित विषय शिकवायचे आणि या शाळेत ते २० वर्ष कार्यरत होते. ते अतिशय दयाळू आणि प्रोफेशनल व्यक्त होते. मागील वर्षी पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी शाळेचे प्रतिनिधित्व केलं होते. त्यांचा मृत्यू आमच्यासाठी मोठी हानी आहे, असे कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी शाळेचे सचिव अजित बालन म्हणाले.

आम्ही राम कांबळे यांच्याकडून सुसाईड नोट हस्तगत केली असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घरगुती कारणांमुळे कांबळे काही महिन्यांपासून तणावाखाली होते, असा संशय आम्हाला आहे. पण इतर बाजूंनीही तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत