बायोपिक ‘ठाकरे’च्या डबिंगला कालपासून सुरुवात

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for thakre movie

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची प्रमुख भूमिका असलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘ठाकरे’च्या डबिंगला कालपासून सुरुवात झाली आहे. नवाजुद्दीनने डबिंग करतानाचा स्टुडिओमधील आपला एक फोटो, चक्क मराठी मध्ये ‘माझ्या समस्त भावांनो आणि भगिणींनो, आजपासून डबिंगला सुरुवात केली आहे …!!!’ अशा कॅप्शनसह ट्विटरवर शेअर करत याची माहिती दिली. नवाजुद्दीन सिद्दीकी

लाखो मराठी लोकांचे दैवत मानले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटातील नवाजुद्दीनचा लुक सुरुवातीपासूनच चर्चेत राहीला. या चित्रपटात अभिनेत्री अमृता राव ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले असून हा चित्रपट पुढील वर्षी २३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत