बारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..

बारामती : विकास कोकरे 

उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये..

शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल कॅमेऱ्यात झाला कैद..

पैसे घेतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल..

महसूल खात्यात सर्वाधिक लाचखोर - Marathi News | Most bribe accepter in  revenue department | Latest nagpur News at Lokmat.com

उपमुख्यमंत्र्याच्या बारामतीत महसूल अधिकारी विविध नोंदी लावण्यासाठी शेतकऱ्याची लाखो रुपयांची लूट करत आहेत. काटेवाडी गावात तलाठी महेश मेटे हे सातत्याने सातबाऱ्यावर विहिरींची नोंद लावण्यासाठी विकास घायगुडे या शेतकऱ्याकडे सातत्याने पैश्याची मागणी करत होता. शेतकऱ्यांने बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांची देखील याबाबत भेट घेतली होती. यावर तहसीलदार यांनी तलाठी मेटे याला नोंद लावण्याचा आदेश दिला होता. मात्र तरी देखील तलाठी नोंद लावत नव्हता. म्हणून शेतकऱ्यांने पैसे देण्याचा निश्चय केला आणि पैसे देत असताना आपल्या मोबाईल मध्ये व्हिडीओ चित्रकरण करून घेतले. या भ्रष्ट तलाट्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी बारामतीतील तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत