बारामतीत कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या; पोलिसांनी रात्रभर केली धरपकड, 6 जण ताब्यात

बारामती : रायगड माझा 

जामिनावर सुटलेला कुख्यात गुंड अक्षय जमदाडे उर्फ छोटा विमल याच्या निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. गुरुवारी ( ता. 28) मध्यरात्री शहराच्या जळोची भागात ही घटना घडली.

जळोची भागातील देवकाते कुटुंबातील तरुणांबरोबर त्याचा किरकोळ वाद झाला होता. त्याच्यात झालेल्या मारहाणीत छोटा विमलच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करून त्याची हत्या झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीतच धरपकड करत याप्रकरणी सहा जणाना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

छोटा विमलने पोलिसांना आणले होते जेरीस

– दरोडे, लुटमारीने त्याने बारामती परिसरातील पोलिसांना जेरीस आणले होते.

– छोटा विमलवर पुणे जिल्ह्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत