बारामती प्रशासनची “जागरण गोंधळा’ने पळापळी

जेवरे यांच्या विविध मागण्या मान्य : उपोषण घेतले मागे 
अजित पवारांच्या निवास्थानाबाहेर आंदोलनाचा दिला होता इशारा

रायगड माझा वृत्त 

बारामती – आमदार अजित पवार यांच्या निवास्थानाबाहेर जागरण गोंधळ घालणार असा इशारा देताच सुस्त प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर नगरपरिषदेसमोर भाजपचे सुरेंद्र जेवरे यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी अश्‍वासनानंतर अखेर संपुष्टात आले. आमदारांच्या निवास्थानाबाहेर जागरण गोंधळ होऊ नये यासाठी नगरपरिषदेच्या कारभाऱ्यांनी आटापीटा केला. नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात त्यासाठी दिवसभर नाटयमय घडामोडी घडल्या.

शहारातील श्री गणेश मंडईतील गाळ्यांचा लिालावाचा प्रश्‍न, श्री संत जगनाडे महाराज शॉपींग सेंटरमधील गाळ्यांचे न्यायप्रविष्ठ प्रकरण, स्वच्छ सर्वेक्षणात झालेला भ्रष्टाचार, भिगवण चौकातील बेकायदेशीर गाळ्यांबाबत कारवाई तसेच नटराज नाट्य कला मंदिरातील बेकायदेशीर कामांची पडताळणी या मागण्या घेऊन जेवरे यांनी नगरपरिषदेसमोर दोनवेळा चक्री उपोषण केले. मात्र, नगरपरिषदेने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे जेवरे यांनी आमदार अजित पवार यांच्या निवास्थानाबाहेर जागरण गोंधळ घालण्याचा निर्णय घेतला. याची दखल घेत जेवरे यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने अखेर पवले उचलली.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव तसेच काही नगरासेवकांनी तत्परता दाखवत जेवरे यांच्या प्रकरणात मध्यस्ती केली. मुख्याधिकारी कामानिमित्त बाहेर असल्याने ते येईपर्यंत सर्वांना वाट पहावी लागली. मुख्याधिकाऱ्यांचे आमन होताच त्यांच्या दालनात जेवरे यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चेअंती तोडगा काढण्यात आला. मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी जेवरे यांच्या विविध मागण्या मान्य करीत त्यांना लेखी पत्र दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय संघवी, गणेश सोनवणे, विष्णूपंत चौधर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तीयाज शिकीलकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भामे, शहाजी कदम उपविभागीय पोलीस अधिकारी शहाजी कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत