बारामती हादरली; एकाच दिवसात कोरोनाने घेतला २२ जणांचा मृत्यू

बारामती : विकास कोकरे

बारामतीत कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्षरशः मृत्यूचे तांडव पहायला मिळत आहेत. बारामतीत एकाच दिवसात २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे बारामती करांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल बारामतीत ११०५ जणांच्या तपासणीमध्ये तब्बल ३९५ जण पॉझिटीव्ह आढळले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांहून कमी होणे गरजेचे असल्याने प्रशासन आता कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे..

बारामतीत रुग्णसंख्या १५ हजारांच्या टप्प्याकडे चालली आहे. काल रुग्णसंख्या १४२८२ झाली असून १०८०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर मृत्यूचा आकडा हा २२८ इतका झाला आहे. त्यात एकाच दिवसात बारामतीत २२ मृतदेहांवर नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार केले गेले. यापैकी १६ जण हे बारामती शहर व तालुक्यातील आहेत. इतर जिल्ह्यातील ६ असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितलेय..

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत