बारावीच्या विद्यार्थ्याची लाईव्ह आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीला अटक

 कोलकाता : रायगड माझा 

प्रेमात ब्रेकअप झालेल्या एका बारावीच्या विद्यार्थ्याने प्रेयसीशी चॅटींग करत असताना गळफास घेत लाईव्ह आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तो आत्महत्या करत असल्याचे मोबाईलवर पाहताच त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने ताबडतोब त्याच्या आईला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. आईने मुलाच्या रुममध्ये जाऊन खातरजमा करण्यापुर्वीच गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्राण गेलेला होता. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन प्रेयसीला अटक केली आहे.

पश्चिम बंगालच्या नॅार्थ २४ परगना जिल्ह्यातील बारुइपुर मध्ये राहणारा स्वराज राय हा १२ वी चा विद्यार्थी होता. त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा झाला. प्रकरण ब्रेकअप पर्यंत गेले. त्यामुळे स्वराज हा गेले काही दिवस नैराश्याच्या गर्तेत सापडला होता. गुरुवारी रात्री त्याने आपल्या बेडरुममधुन त्या प्रेयसीला मोबाईलवरुन फोन केला. थोडावेळ बोलणे झाल्यानंतर त्याने लाइव आत्महत्या केली.त्यामुळे घाबरलेल्या प्रेयसीने त्याच्या आईला सर्व घडलेला प्रकार कळविला.मात्र प्रियकराच्या आईने त्या मुलीविरुद्धच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केल्याने पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला अटक केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत