बालपणाचं स्वप्न आता सत्यात उतरणार; ‘मालगुडी डेज’मधील मालगुडी स्टेशनला जाणं शक्य होणार

मुंबई: रायगड माझा वृत्त 

‘मालगुडी डेज’ या मालिकेतील काही महत्त्वाच्या भागांचे चित्रीकरण कर्नाटकातील अरसळु या गावात झाले. मालिकेत दिसणारे मालगुडी स्टेशनदेखील अरसळु स्टेशन होते. भारतीय रेल्वेने ‘मालगुडी डेज’चे दिग्दर्शक शकंर नाग यांना आदरांजली वाहण्यासाठी स्थानकाचे नाव मालगुडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, या स्टेशनची डागडुजी देखील भारतीय रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

आर के नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ या टीव्ही मालिकेने ९० च्या दशकात अनेकांचं भावविश्व व्यापून टाकलं. ‘मालगुडी डेज’ मधील स्वामीप्रमाणे आपणही त्या टुमदार मालगुडी स्टेशनवर आगगाडीत बसून जावं असं स्वप्न लहानपणी प्रत्येकानं पाहिलं असेल. तुमच्या बालपणाचं हे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. भारतीय रेल्वेनं कर्नाटकातील अरसळु रेल्वे स्थानकाचे ‘मालगुडी’ असं नामकरण करायचं ठरवलं आहे.

मालगुडी स्टेशनबाहेर ‘मालगुडी डेज’ संग्रहालय उभारण्याचादेखील प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत