बाळाला मारून आईची आत्महत्या

बंगळुरू : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for suicide

बंगळुरू शहरातील महादेवपुरा भागात एका महिलेने तिच्या तीन महिन्याच्या बाळाला ठार मारलं आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. या महिलेचे नाव भवानी असल्याचं सांगण्यात येत असून ती मूळची मैसूर इथली राहणारी होती. गेल्या शनिवारी तिने बाळाचा गळा आवळून ठार मारलं आणि मग आत्महत्या केली.

भवानीला सतत भीती वाटत होती की तिला अज्ञात विषाणूची लागण झाली आहे. आपल्यामुळे बाळालाही या विषाणूची लागण झाली असावी अशी तिला भीती वाटत होती. या भीतीपोटीच तिने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. भवानी एका मॉलमध्ये कामाला होती. तिथेच तिची ओळख एका तरूणाशी झाली आणि त्यांचं प्रेम जुळलं. या दोघांनी लग्न केलं आणि ते सुखी आयुष्य जगत होते. या दोघांमध्ये कोणतेही वाद नव्हते आणि भवानी तिला भीती वाटत असलेल्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती औषधेही घेत नव्हती.

भवानीचे आईवडील जिवंत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या काकूला फोन करून आपल्या पोटात दुखत असल्याचं सांगितलं होतं. काही दिवसांसाठी ती तिच्या घरी रहायला गेली होती. शनिवारी जेव्हा तिची चुलत बहीण कामावरून घरी आली तेव्हा भवानीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तिला दिसलं. भवानीने एक सुसाईड नोट लिहली असून त्यात लिहलंय की तिच्यामुळे तिच्या नवऱ्यालाही विषाणू संसर्ग झाला असल्याची तिला भीती वाटत आहे. नवऱ्याप्रमाणेच मुलीला हा संसर्ग झाल्याची भीती तिला वाटते आहे. इतरांना हा संसर्ग होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचं तिने म्हटलं आहे. भवानीला खरोखर काही लागण झाली होती का हे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये उघड होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत