बाळासाहेबांच्या नावावर महापौर बंगला गिळला जातोय : राज ठाकरे

मुंबई : रायगड माझा वृत्त

महापौरांच्या निवासस्थानासाठी दिल्या जाणाऱ्या जागेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. बाळासाहेबांच्या नावावर कुणासाठी तरी बंगला गिळला जातोय, उद्या हे राजभवन मागतील,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानासाठी नवीन जागा दिली जाणार आहे. ही नवीन जागा देण्यास आता मनसेनं विरोध केला आहे. ‘महापौरांच्या निवासस्थानासाठी नवीन जागेवर कोणत्याही परिस्थिती बंगला बांधू देणार नाही.

स्मारकासाठी महापौर बंगला देणे, असे पायंडे पाडणं चुकीचं आहे. अनेक बिल्डरांना अनेक भूखंड वाटले गेले आणि बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तुम्हाला एखादी जागा मिळत नाही?’ असा सवाल करत राज यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला घेतल्यानंतर महापौर निवासस्थानाच्या अनेक जागा बदलल्या. कधी राणीची बाग तर कधी आणखी कुठे,आणि आता जिमखान्याची जागा महापौर निवासस्थानासाठी देण्याचा प्रयत्न सुरुय. हे आम्ही होऊ देणार नाही. खेळाची जागा निवासस्थानासाठी देऊ नये, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत