बाळासाहेबांनी रचला होता आनंद दिघे यांच्या हत्येचा कट, निलेश राणे यांचा गंभीर आरोप

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for anand dighe and balasaheb thakre

काँग्रेसचे माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नागिरीत थेट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातले शिवसेना नेते आनंद दिघे यांना कोणी मारलं? गायक सोनू निगम यांना ठार मारण्याचे कुणी प्रयत्न केले? ठाकरे घराणं आणि गायक सोनू निगमचं नातं काय? बाळासाहेबांच्या कर्जतमधल्या फार्महाऊसवर कुणा-कुणाला ठार मारलं? हे सर्व जाहीर सभेत सांगू, असा इशाराच निलेश राणे यांनी दिला.

सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या १० वर्षांतल्या राजकारणात ९ जणांचा बळी नेमके कुणी घेतले?, असा सवाल करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत