बिग बाॅसनंतर आता रेशम टिपणीस दिसणार नव्या भूमिकेत

मुंबई : रायगड माझा वृत्त 

बिग बाॅस मराठीच्या घरात सर्वात गाजलेली व्यक्ती म्हणजे रेशम टिपणीस. भले ती या स्पर्धेतून लवकर बाहेर पडली असेल, पण तिचा बिनधास्त आणि बेधडक अंदाज सगळ्यांना आवडला. तिचं आणि राजेशचं जमलेलं मेतकुटही लोकांनी चवीनं पाहिलं. खरं तर ती जिंकेल किंवा अंतिम स्पर्धकांपर्यंत राहील, असं वाटलं होतं. पण ती अगोदरच बाहेर पडली. बिग बाॅसनंतर आता रेशम टिपणीस नव्या भूमिकेत दिसणार आहे.

बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व झाल्यानंतर अभिनेत्री रेशम टिपणीस पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहे.मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय नाटक ‘वस्त्रहरण’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रेशम टिपणीसला आम्ही वस्त्रहरण नाटक करणार का असं विचारलं होतं, तेव्हाच तिने प्रथम होकार दिला होता.11 ऑगस्टपासून वस्त्रहरणचे प्रयोग सुरू होत आहेत. जुन्या संचातही रेशम टिपणीसने काम केलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा नव्या उर्जेसह ती वस्त्रहरण नाटक करायला सज्ज झालीय.

मच्छिंद्र कांबळींचं वस्त्रहरण नाटक नेहमीच एव्हरग्रीन ठरलंय. नेहमीच नव्या कलाकारांबरोबर ते खुलत गेलंय. आता त्यात रेशम टिपणीसचीही भर पडलीय.

रेशम बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाणारी पहिली स्पर्धक होती. ती या घरामध्ये ९० दिवस राहिली. तिच्या या घरामधील प्रवासामध्ये बरीच वळणं आली, बऱ्याच घटना घडल्या, आव्हानं तिच्यासमोर आली पण तिने सगळ्या परिस्थितींवर मात केली. पहिल्या दिवसापासून रेशम टिपणीस चर्चेमध्ये राहिली. मग कुठल्या टास्कमुळे असो वा सई आणि मेघामध्ये असलेल्या भांडणामुळे. रेशम, आस्ताद, सुशांत, भूषण, स्मिता यांच्यामधील मैत्री नेहमीच चर्चेमध्ये राहिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत