बिग बॉसच्या घरात आक्कासाहेबांची एण्ट्री!

मुंबई: रायगड माझा वृत्त

बिग बॉसच्या घरात दाखल होणारा नवा सदस्य कोण असणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. प्रथमेश परब, देवदत्त नागे, मानसी नाईक अशी अनेक नावं चर्चेत होती, पण त्या सगळ्या नावांना मागे टाकत छोट्या पडद्यावरच्या ‘आक्कासाहेब’ बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या आहेत. आक्कासाहेब म्हणजं कोण हे वेगळं सांगायची गरज नाही. हर्षदा खानविलकर यांनी पुढंच पाऊल या मालिकेत साकारलेली आक्कासाहेब रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

त्याच रुबाबात हर्षदा खानविलकर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात दाखल झाल्या आहेत.हर्षदा खानविलकरचा यांचा स्पष्ट आणि कणखर स्वभाव अवघ्या इंडस्ट्रीला माहित आहे. त्यांचा तोच अंदाज बिग बॉसच्या घरातही दिसेल आणि काहीतरी दमदार पाहायला मिळेल या हिशोबाने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी हे कार्ड खेळलं आहे. आता त्याचा शोला किती फायदा होतोय लवकरच कळेल.

रेशम-राजेशच्या रोमान्सविरोधात तक्रार

बिग बॉस मराठी मालिकेतील अभिनेत्री रेशम टिपणीस आणि  अभिनेता राजेश शृंगापुरे यांच्या अश्लिल वर्तनावर टीकेची झोड उठलेली असताना, नाशकात याबाबत चक्क तक्रार देण्यात आली आहे.  ऋषिकेश बळवंत देशमुख या व्यक्तीनं नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे.

एका एपिसोडदरम्यान दोघांमध्ये अश्लिल संभाषण आणि वर्तन झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दोघांचं  लग्न झालेलं असताना या मालिकेतून विवाहबाह्य संबंधाना खतपाणी घातला जात असल्याचंही तक्रारी म्हटलं गेलंय. त्यामुळे चित्रफितीची चौकशी व्हावी, आणि दोघं कलाकारांबरोबरच कलर्स मराठी वाहिनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत