बिग बॉसच्या घरात महेश मांजरेकरांची एन्ट्री

मुंबई : रायगड माझा वृत्त 

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य शनिवारच्या दिवसाची नेहमीच आतुरतेनं वाट पाहत असतात. शनिवारचा दिवस म्हणजे ‘विकेण्डचा डाव’ या भागात सूत्रसंचालक महेश मांजरेकर सदस्यांशी गप्पा मारतात तर सदस्यांकडून काही चूक झाल्यास त्यांना कानपिचक्या देतात. त्यामुळं घरातील सदस्यांना त्यांचा फार मोठा आधार वाटतो. मात्र, शुक्रवारी झालेल्या भागात महेश मांजरेकर यांनी चक्का पत्नी मेधा मांजरेकर यांच्यासह बिग बॉसच्या घरी येऊन साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

मांजरेकर यांच्या पत्नीनं ‘बिग बॉस’च्या घरात येताना सदस्यांसाठी खास जेवणदेखील आणलं होतं. महेश मांजरेकर बिग बॉसच्या घरात येताच त्यांच्याकडं एक कार्य सोपविण्यात आलं. सई, मेघा, पुष्कर आणि स्मिता यांना स्वतः व्यतिरिक्त बिग बॉसचा विजेता होण्यास कोण अधिक पात्र आहे हे महेश यांना पटवून द्यायचं होतं. ज्या सदस्यांना अधिक मतं मिळतील, त्या सदस्याला थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार होतं. पुष्करनं यात बाजी मारली. त्याला सर्वाधिक मत मिळाल्यानं अंतिम फेरीत पोहचण्याची संधी मिळाली आहे. या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? आणि कोणाला अधिक मतं मिळणार? हे पाहणे आणखी रंजक ठरणार आहे

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत