बिग बॉसनं दिला शिवानीला सदस्यत्वाचा दर्जा

मुंबईः रायगड माझा वृत्त 

बिग बॉस च्या घरामध्ये काल शिवानी आणि अभिजीतमध्ये हल्लाबोल हे कॅप्टनसी कार्य पार पडलं. या कार्यात शिवानी विजयी झाली घराची कॅप्टन झाली. काल झालेल्या भागात बिग बॉसनं शिवानीला सदस्यत्वाचा दर्जा दिला आहे. त्यामुळं आता ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून वावरणार आहे. 

शिवानी सुर्वे घरात पाहुणी म्हणून आल्यानं ती कीती दिवस घरात राहणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता मात्र ती उत्सुकता संपली आहे. कॅप्टनसीचा हा टास्क पार पाडल्यानंतर बिग बॉसनं शिवानीला कन्फेशन रूममध्ये बोलवून तिला सदस्यत्वाचा दर्जा दिला व आता ती पाहुणी नसून स्पर्धक म्हणून या खेळात सहभागी होणार असल्याचं सांगितलं.

मात्र, तेव्हा ती घरात फक्त पाहुणी असेल व तिचा घरातला सहभाग बघून तिला स्पर्धक म्हणून पुन्हा घरात घेण्याचा विचार करण्यात येऊल असा निर्णय घेण्यात आला होता.  दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याला घरातून बाहेर काढावे अशी मागणी शिवाजी सुर्वेने बिग बॉसकडे केली होती. अखेर काही दिवसांनंतर तिला घरातून बाहेर काढण्यात आले. परंतु, काही दिवसांनी शिवानीनं घरा पुन्हा एन्ट्री केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत