‘बिग बॉस’ फेम विकास गुप्ता आणि आदित्य नारायण यांना ‘खतरो के खिलाडी’ दरम्यान अपघात

अर्जेंटिना : रायगड माझा वृत्त 

‘बिग बॉस’ फेम विकास गुप्ताला अजगर चावला आहे. अर्जेंटिना येथे सध्या चालू असलेल्या ‘खतरो के खिलाडी ‘ या रिअॅलिटी शोच्या शुटिंग दरम्यान ही घटना घडली. तसेच एका स्टंटदरम्यान आदित्य नारायणच्या डोळ्याला गंभीर दु:खापत झाली आहे.

अर्जेंटिना येथे ‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शोचे चित्रीकरण सुरू होते. या शोला अधिक रोमांचक बनवण्यासाठी निर्माते अनेक प्रकारचे अॅक्शन सिक्वेन्स शूट करत होते. तेवढ्यात अचानक कॉमेडियन भारती सिंहवर एका अजगराने हल्ला केला. भारतीला संकटात सापडलेले पाहून तेथे उपस्थित असलेल्या विकास गुप्ताने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजगराने विकासला दंश केला. त्यानंतर विकासवर तात्काळ उपचार करण्यात आले. त्याला काही इंजेक्शन्स देण्यात आले आहेत. त्याची प्रकृती सुधारण्यास काही दिवस लागतील, असं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.

एकीकडे ही घटना घडलेली असतानाच याच सेटवर एक स्टंट करत असताना आदित्य नारायण  जोरदार आपटला. त्यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दु:खापत झाली आहे. त्यानंतर आदित्यला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आदित्यलादेखील डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ‘खतरो के खिलाडी’चा सूत्रसंचालक रोहित शेट्टीने या दोन्ही घटनांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनांवरून शोच्या टीमने धडा घेतला असून स्टट्ंस करतेवेळी अधिक सुरक्षा बाळगण्याचं त्यांनी ठरवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत