बिग बॉस सिझन 13: पारस छाब्रावर भडकला सलमान खान

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

Image result for पारस आणि सलमान खान

बिग बॉस सिझन 13 हा कार्यक्रम सध्या जोरदार गाजतोय. त्यात शनिवारचा विकेंड का वार म्हंटल की प्रेक्षकांना आणखीनच उत्सुकता असते. बिग बॉसच्या शनिवारच्या विकेंड का वारचा प्रोमो त्यांच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात सलमान पारस छाब्रावर संतापलेला दिसत आहे. सुरुवातीला सलमान मधुरिमा आणि विशालला त्यांच्या वर्तणुकीचा जाब विचारताना दिसतो. त्यानंतर पारस छाब्राची कानउघाडणी करताना दिसतो.

पारसच्या वरील बोलण्यावर सलमान सांगतो की, हे कोणी क्रिएटिव्सचं बोललेलं नाही. मला आकांक्षानं स्वतः कॉल केला होता हे विचारण्यासाठी की नक्की त्या ठिकाणी काय चाललं आहे. यावर गप्प बसण्याऐवजी पारस सलमानला प्रत्युत्तर करतो. माहिरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र पारस गप्प राहिला नाही. तो म्हणाला, माझ्यावर आरोप केले जात आहेत आणि मी गप्प बसू. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर सलमानला राग अनावर झाला आणि तो म्हणाला, आरोप काय लावला जात आहे… पारस हा टोन माझ्यासाठी वापरायचा नाही. पण पारस यावरही शांत राहिला नाही. तो म्हाणाला हा आरोप आहे आणि हा बेकार आरोप आहे. मला नाही माहित हे कुठून आणि कोण लावत आहे.

पारसच्या अशा वागण्यावरुन सलमानचा पारा चढला आणि त्यानं पारसला चांगलचं सुनावलं. पारसकडे बोट दाखवत सलमान म्हणला, तुझा आवाज खाली ठेव. सलमानचा राग पाहून पारस शेवटी शांत बसतो. पण तोपर्यंत त्याचं रहस्य सर्वांसमोर आलेलं असतं. त्यामुळे आता सलमान खान किंवा बिग बॉस पारसबाबत पुढे काय निर्णय घेतात याची सर्वांना उत्सुकता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत