बिहारमधील बालगृहातील अत्याचार प्रकरणी संसद अधिवेशनात गोंधळ

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

संसद अधिवेशनात आज बिहारमधील बालगृहातील लैंगिक अत्याचाराच्या मुद्यावरून गोंधळ पहायला मिळाला.

मुझफ्फरपूर येथील बालगृहातील लैंगिक अत्याचाराचा मुद्दा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार जय प्रकाश नारायण यादव यांनी लोकसभेत उपस्थित करत या प्रकरणातील पुरावे नष्ट केले जात असल्याचा आरोप केला. हे प्रकरण गंभीर असून मुलींना खेळणे समजून त्यांचा वापर केला आहे. या प्रकरणात राज्य सरकारचा थेट सहभाग असल्याचाही आरोप त्यांनी केला. या मुद्यावरून लोकसभेचे कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही आरजेडीचे जय प्रकाश नारायण यादव यांचा मुद्दा उचलून धरला. बालगृहातील 40 मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार गायब असल्याचे काँग्रेसचे खासदार रंजीत रंजन यांनी निदर्शनास आणून दिले.

यावर बोलताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या की, या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी रोज उत्तर दिले जाणार नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत