बीडखुर्द गावात मनसेच्या वतीने २५० वाफेच्या मशिनचे वाटप

खालापूर : समाधान दिसले

कोरोना विषाणूपासून बचाव होण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असताना त्यातील एक उपाय म्हणजे वाफ घेणे होय. परंतु अनेकांना वाफ घेण्याची मशीन आर्थिक चणचणीमुळे विकत घेणे शक्य होत नसल्याने बीडखुर्द गावातील ग्रामस्थांना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य मनसे तालुका अध्यक्ष सचिन कर्णुक यांच्या माध्यमातून २५० वाफेच्या मशिनचे वाटप केल्याने मनसेच्या उपक्रमाचे बीडखुर्द ग्रामस्थांनी आभार मानले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष सचिन कर्णुक यांच्या वतीने बीडखुर्द गावातील ग्रामस्थांना मोफत २५० ङस्टीमर Steam Vaporizer Machine (वाफ घेण्याची मशीन) चे वाटप करण्यात आल्याने मनसेच्या या अनोख्या उपक्रमाचे बीडखुर्द ग्रामस्थांनी कौतुक केले असून याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष सचिन कर्णुक, दिपक कर्णुक, जनार्दन सालोखे, हरेश चंदने, कल्पेश कर्णुक, गणेश बेडेकर, पंकज कर्णुक, संकेत कर्णुक, सुमीत कर्णुक, संतोष भगत, संदेश कर्णुक पवन कर्णुक, निलेश कर्णुक, अक्षय काठावले, समीर कर्णुक, प्रशांत काठावले, दिनेश बडेकर, किशोर कर्णुक, कैलास कर्णुक आदिप्रमुख उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत