बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एबीसीच्या जाळ्यात, पाच लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

Additional Collector Arrest by ABC in bribe case at beed

बीड : रायगड माझा वृत्त

बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबूराव कांबळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या वृत्तामुळे बीड जिल्ह्यामध्ये जबरदस्त खळबळ माजली आहे. कांबळे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपीक महादेव महाकुंडे यांनाही अटक करण्यात आली आहे.

बीडमधील एका सरकारी कर्मचाऱ्याचे भ्रष्टाचाराच्याच प्रकरणात निलंबन झाले होते. या प्रकरणाची चौकशी कांबळे यांच्याकडे देण्यात आली होती. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी कांबळे यांनी या कर्मचाऱ्याकडून 10 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. या लाचेतील पहिला हफ्ता कांबळे यांना दिला जाणार होता. याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आली होती. 5 लाखांचा पहिला हफ्ता घेताना कांबळे यांना त्यांच्या घरातूनच अटक करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत