बीडमध्ये कार अपघातात इंदुरच्या 3 कापड व्यापाऱ्यांचा मृत्यू

माजलगाव : रायगड माझा ऑनलाईन

बीडमध्ये भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील माजलगाव तालुक्यातील टाकरवन फाट्याजवळ हा अपघात झाला. मृतांमध्ये सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित यांचा समावेश आहे. हे सर्व मध्यप्रदेशातील इंदुरचे रहिवासी असून ते कपड्याचे व्यापारी आहेत.

इंदुर येथील तीन व्यापारी बीड येथे आले होते. दिवसभर काम उरकून रात्री मुक्कामासाठी लातूर येथे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची कार टाकरवन फाट्याजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात गाडीतील तिन्ही व्यापाऱ्यांचा जागीच जागीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा तिन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत