बीड जिल्ह्यात खेळला जातोय डिजिटल जुगार

बीड : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for ludo king game

तंत्रज्ञानाच्या चांगल्या वापराबरोबरच त्याचा काही जणांकडून वाईट वापरही करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात लुडो किंग गेमच्या माध्यमातून डिजिटल जुगार खेळला जात आहे. यामध्ये युवक तासन्‌तास मोबाईलमध्ये हा गेम पैशांवर खेळत आहेत. यामुळे जिल्ह्यात सध्या या गेमची क्रेझ निर्माण झाली असून, बहुतांश तरुणांच्या मोबाईलमध्ये लुडो किंग गेम दिसून येत आहे.

पोलिस कधी करणार कारवाई ? 
सध्या जिल्ह्यात डिजिटल लुडो किंगचा नवा जुगार आला असून हजारो रुपयांची उधळण या गेमवर होत आहे. यात विशेष म्हणजे हा गेम सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असून त्यांना याचे व्यसन लागत आहे. यामुळे जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

लुडो खेळणे कायद्याने गुन्हा
मनोरंजनासाठी लुडो गेमची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु या गेमचा कुणी वाईट वापर करत असेल किंवा लुडो गेम पैशाने खेळला जात असेल, तर तुरुंगाची हवा खावी लागू शकते. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पैशाने लुडो खेळणाऱ्यांना पोलिसांनी जेलची हवा दाखवली होती. लुडोकिंग गेम पैशाने खेळणे कायद्याने गुन्हा आहे.

काय आहे लुडो किंग गेम
लुडो किंग गेममध्ये चार किंवा सहा जणांचा सहभाग असतो, प्रत्येकाकडे चार-चार घोडे असतात. ज्याचे चारही घोडे सर्वप्रथम राऊंड मारून आत जातील, तो विजयी होतो व त्याला डावातील सर्व पैसे दिले जातात.

आतापर्यंत लुडो गेमच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत व तसे आमच्याही निदर्शनास अद्याप आलेले नाही; परंतु लुडो गेमचा वापर जुगार खेळण्यासाठी होत असेल तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
– सुधीर खिरडकर, पोलिस उपअधीक्षक, बीड

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत