बीड धुक्यात हरवले, महामार्गावरील वाहतूक मंदावली

beed-cold

बीड : रायगड माझा वृत्त

थंडीच्या लाटेने बीड जिल्हा गारठला असून तापमानाचा पारा 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे. यासोबतच सकाळच्या दाट धुक्यात बीड हरवले आहे.

धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये ही विद्यार्थ्याची संख्या रोडावली आहे. ग्रामीण भागात चौकांमध्ये शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत