बुलढाणा बस स्थानक व्यवस्थापकाला भाजप कार्यकर्त्यांची बेदम मारहाण

बुलढाणा : रायगड माझा वृत्त 

बुलढाण्यातील खामगाव इथे आगार व्यवस्थापकाला भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. व्यवस्थापकाविरोधात आलेल्या अनेक तक्रारीवरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाजपा आमदार आकाश फुंडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी व्यवस्थापकाला निलंबित करण्याची मागणी भाजप आमदाराने केली. दरम्यान वरिष्ठांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

गेल्या अनेक दिवसांपासून खामगाव येथील आगार व्यवस्थापक रितेश फुलपगारे हे मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पंढरपूर यात्रेसाठी अतिरिक्त बस न सोडता वारकऱ्यांची अडवणूक करणे, कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यासाठी पैशाची मागणी करणे, कार्यालयात मद्य प्राशन करणे अश्या विविध त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय आगार बंद आंदोलन छेडले होते. दरम्यान आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आमदार आकाश फुंडकर यान भेट घेवून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या जाणून घेताना कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाच्या वागणुकीचा पाढा वाचला. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रवाश्यांनी रितेश फुलपगारे यांचेवर ऑइल फेकत त्यांना चोप दिला. दरम्यान आमदार फुंडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत दूरध्वनी वरून संपर्क करत रितेश फुलपगारे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत