बुलढाण्यात महिला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला मारहाण

बुलढाणा: नितीन कानडजे पाटील

आरटीओ कार्यालय परिसरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्यांच्या शासकीय वाहन चालकाला मारहाण झाल्याची घटना बुलढाण्यात घडली. ही मारहाण एजंट सतीश किसन पवार आणि त्याच्या दोन भावांनी केली आहे. दरम्यान या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्यावर देखील अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या कार्यालयात पोहोचल्या तेव्हा त्यांच्या गाडी चालकासोबत एजंट सतिष पवार यांच्यासह रंगनाथ पवार आणि दीपक पवार यांनी वादविवाद करून मारहाण केली. यावेळी जयश्री दुतोंडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील या तिघा भावांनी मारहाण केली. या मारहाणी नंतर जयश्री दुतोंडे यांनी पोलीस ठाण्यात पवार बंधूविरोधात तक्रार नोंदविली आहे. बुलडाणा तर दुसरीकडे सतिष पवार यानेही जयश्री दुतोंडे यांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. आपल्याला जयश्री दुतोंडे आणि त्यांच्या स्विय सहाय्यकांनी मारहाण केल्याचा आरोप पवार याने केला आहे. त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारींची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने एआरटीओ कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दीपक पवार आणि रंगनाथ पवार या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर सतिष पवार हा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती आहे. सतिष पवार याने दाखल केलेल्या तक्रारीवरुन आरटीओ जयश्री दुतोंडे यांचेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत