बुलेट ट्रेनची योजना राज्याला परवडणारी नसून आम्ही ती बंद करणार : पृथ्वीराज चव्हाण

बुलेट ट्रेनची योजना राज्याला परवडणारी नाही. हा प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प आम्ही बंद करणार आहोत, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनची आज गरजही नाही. त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या माथी मारणं योग्य होणार नसल्याने आम्ही हा प्रकल्प बंद करणार आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. भाजपने साम, दाम, दंड वापरून विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेत्यांना धमक्या देण्यात आल्या. नेत्यांना नाक घासायला लावून त्यांचं पक्षांतर करून घेतलं. म्हणूनच भाजपला रोखण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला, असं ते म्हणाले. राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. प्रत्येक पक्ष आपआपले मंत्री ठरवतील. येत्या दोन दिवसात मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. काँग्रेस हायकमांड या संदर्भात जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत