बॅ.अंतुले हे मुख्यमंत्री झाले नसते तर मुरूड तालुका मागासलेला राहिला असता : सुभाष महाडिक 

मुरूड : अमूलकुमार जैन

बॅ.अंतुले हे मुख्यमंत्री  झाले नसते तरमुरूड तालुका हा आज पर्यटन स्थळ म्हणून जागतिक नकाशावर आले नसते. असे प्रतिपादन मुरूड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष महाडिक यांनी मांडला  यांच्या सत्कार  ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि नवनिर्वाचित सदस्य यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.
 
राजकारणात कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो.मांडला येथील काँग्रेसचे नेते अजगर दळवी यांच्या इच्छा होती की मांडला ग्रामपंचायत निवडणूक ही शिवसेनेसोबत आघाडी करून लढायची. त्याप्रमाणे ही निवडणूक लढविली गेली आणि या निवडणुकीत विरोधकांनी अनेक अफवा केल्या होत्या. की विरोधक ग्रामपंचायत ताब्यात घेणार. मात्र मांडला येथील सेनेचे जेष्ठ नेते सुरेश पालवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने पंचायत ताब्यात ठेवण्यात यश प्राप्त केले. यातून विरोधकांना चांगलीच चपराक दिली.
मुरूड तालुक्याचे माजी तालुका प्रमुख भगीरथ पाटील यांनी सांगितले की,वीस वर्षांपूर्वी मांडला ग्रामपंचायत ही विरोधकांकडून शिवसेनेने ताब्यात घेतली.मांडला ग्रामपंचायत मध्ये पहिला सरपंच होण्याचा मान मुकुंद पालवणकर यांना मिळाला.तदनंतर आजपर्यंत चार सरपंच दिले आहेत.सुरेश पालवणकर यांच्या सारखा निष्ठावान कार्यकर्ता कोणीही सापडणार नाही.मांडला ग्रामपंचायत मध्ये जेवढे सेनेचे सरपंच झाले आहेत ते केवळ पालवणकर यांच्यामुळेच.त्यांनी कधीही सत्तेचा हव्यास केला नाही.या निवडणुकीत जबरदस्तीने त्याच्या पत्नी सुचिता पालवणकर यांना थेट सरपंच पदासाठी उभे राहण्यासाठी भाग पाडले होते.मात्र यावेळची निवडणूक ही वेगळी होती कारण आमच्यातील काही शिवसैनिक हे स्वतःच्या हितासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या दावणीला बांधले गेले होते. तरी ही निवडणूकीत शेकापला चांगलीच चपराक दिली आहे.
मांडला ग्रामपंचायतचे माजी सरपंच शैलेश रातवडकर यांनी सांगितले की,निवडणुकीत विजय मिळाला हा केवळ विरोधकांमुळे.कारण त्यांनी आम्हाला डीचवले नसते तर आम्ही ही निवडणूक गांभीर्याने घेतली नसती.सद्यस्थितीत जे शिवसैनिक हे शिवसेनेत होते तेव्हा ते वाघ होते.मात्र आता ते शेतकरी कामगार पक्षात जाऊन शेळी बनले आहेत.सुरेश पालवणकर यांना तालुकाध्यक्ष पद मिळत असताना सुद्धा त्यांनी पदाची अपेक्षा न करता सेनेशी फारकत घेणाऱ्या व्यक्तीला दिले.तसेच त्याच्या पत्नीस पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करून पंचायत समितीच्या सभापती बसविले.याचीही जाण त्यांना ठेवता आली नाही.
यावेळी सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र गायकवाड यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा श्रद्धा ठाकूर,सरपंच सुचिता पालवणकर उपसरपंच ,काकळघर सरपंच साक्षी ठाकूर, मांडला माजी सरपंच शैलेश रातवडकर,माजी प्रभारी सरपंच साक्षी गायकवाड,सुरेश पालवणकर,गणेश रातवडकर, सतेज ठाकूर,आदी मान्यवर उपस्थित होते

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत