बेंबला धरणात तरुणाचा मृतदेह 

यवतमाळ : कल्पक वाईकर   

 यवतमाळ जिल्ह्यातील मोठया धरणामध्ये गिणती होत असलेल्या आणि बाभूळगाव पासून 5 किलो मीटर अंतरावर असलेल्या बेंबला धरणात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .
बाभूळगाव येथील कुणाल माणिकराव आडे हा तरुण गेल्या काही दिवस पासून बेपत्ता होता.  आज बेंबला धरणातील पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याचं त्याच्या नातेवाईकांना माहिती मिळाली .  त्यानुसार नातेवाईकांनी धरणाजवळ  जाऊन पहिले असता  असता तो मृतदेह कुणालचा असल्याचं समजलं .  मृतदेह धरणाच्या काठावर तरंगत होता आणि शरीरावरमाशांनी  चावा घेतल्याच्या जखमाही दिसत असून या तरुणाने आजाराला कंटाळून आत्महत्त्या केल्याची माहिती समोर येत आहे . या घटनेची माहिती  पोलिसांना देण्यात आली  असून चौकशी अंती घटनेतील सत्य समोर  येईल.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत