“बेटी बचाओ’साठी दहा रणरागिणी धावल्या!

पिंपरी – “बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या जनजागृतीचा संदेश देण्यासाठी 68 वर्षे वयाची वृद्ध महिलेसह 10 महिलांनी मुंबई ते पुणे दौड केली. या दौडचे पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने पिंपरीत स्वागत करण्यात आले.

दि. 22-24 नोव्हें या दरम्यान “मुंबई ते पुणे रन फॉर बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त मुंबई ते पुणे रन (दौड) आयोजित केली आहे. या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
मुंबई-दादर येथून सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन दि. 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता दौड सुरु करण्यात आली. या दौडचे पिंपरी- चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी चौक, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास आगमन झाले.

भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ‘मुंबई ते पुणे रन फोर बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानासाठी’ धावणाऱ्या सुरजीत कौर, श्रीदेवीने पडुवल, मानसी जोशी, राखी रास्ते, संध्या ओक, भारती जोशी,सुनिता मुंडे, मनीषा लांबा या साहसी महिला धावपटूंवर फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शैलेजा मोरे, महिला व बालकल्याण समित्यांच्या सभापती सुनिता तापकीर, प्रदेश सचिव उमा खापरे यांच्या हस्ते या सर्व साहसी महिला धावपटूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, बचाओ बेटी पढाओ अभियानाचे प्रदेश संयोजक शामराव सातपुते, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मंडलाध्यक्ष अजय पाताडे, बिभीषण चौधरी, रामकृष्ण राणे, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, अमित गुप्ता, सारिका चव्हाण, माधवी इनामदार, धनंजय शाळिग्राम, संजय परळीकर, सविता करपे, विकास मिश्रा, दिपक नागरगोजे, किरण माने आदी उपस्थित होते.

“मुंबई ते पुणे रन फोर बेटी बचाओ बेटी पढाओ’ या जनजागृती अभियान दौडच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत